Ushnodak (उष्णोदक)
Ushnodak (उष्णोदक)

#ऊष्णोदक

गरम पाणी पिण्याचे फायदे.

आयुर्वेदात महर्षि वाग्भटांनी उष्ण जल सेवनाचे अनेक फायदे सांगीतले आहेत. आणि ते प्रत्यक्षात घडताना दिसतात देखील.

उष्ण जल व्याधी क्षमत्व कसे वाढविते असा प्रश्ण पडणे साहजिक आहे.

तत् कफम् विलयन् नीत्वा तृष्णां आशु निवर्तयेत् ||

उष्ण पाणी कफाला वितळवून तहान त्वरित शमन करते. त्यामुळे कमी प्रमाणात पाणी पिऊन देखील तहान शमते.

आयुर्वेदात अनावश्यक अधिक पाणी पिण्याने हानी होते असे देखील सांगीतले आहे. (जलाधिक्यात् मनुष्याणां आम प्रवृत्तिः प्रजायते |)

"उदीर्य च अग्निं ..स्त्रोतांसि मृदुकृत्य विशोधयेत् ||"

"अग्नि" म्हणजेच सर्व शरीरा ची पचन शक्ति वाढवून शरीरातील मार्ग मोकळे करते. शरीरातील सर्व सूक्ष्मातिसूक्ष्म मार्ग मोकळे केल्याने, तिथे जमलेले दोष, (जे कोणताही व्याधी निर्माण करू शकतात,) यांचे शोधन व शुद्धि होऊन शरीर निरोगी रहते.

"लीन पित्त अनिल स्वेद शकृन् मूत्र अनुलोमनम् ||"

"लीन" म्हणजेच जे प्रवाहित व्हायला हवेत परन्तु झाले नाहीत असे पित्त, वायु, स्वेद म्हणजे घाम, मल, मूत्र यांचे "अनुलोमन" म्हणजे ज्याच्या त्याच्या योग्य मार्गाने वाहण्यास प्रवृत्त करते.

"निद्रा जाड्य अरुची हरम् ..."
  • ”निद्रा” (येथे अप्राकृत किंवा अति निद्रा अपेक्षित आहे ),
  • “ जाड्य” : शरीराचा व मनाचा जड पणा, आळस सुन्न पणा.
  • “अरुची” : अन्नाची चव न लागणे

हि लक्षणे गरम पाणी दूर करते.

"प्राणानाम् अवलंबनम् ।।"

प्राणाचे धारण करते. 

  • "दीपनं" : भूक सुधारते 

~ "पाचनं" : पचन शक्ति सुधारते 

~ "कंठय" : कंठाला हितकर म्हणजे स्वर सुधारणारे आणि कंठाला बळ देणारे

"लघु उष्ण बस्तिशोधनं"

आपल्या लघु आणि उष्ण गुणाने "बस्ति" म्हणजेच मूत्राशयाचे शोधन करणारे त्याचे कार्य सुधारणारे असते. 

  • "हिध्मा" : सतत उचकी लागणे
  • "आध्मान" : पोट सतत भरल्या सारखे फ़ुगलेले वाटणे. या लक्षणांना दूर करते.
  • "अनिल श्लेष्म सद्य शुद्धि नवज्वरे" 

नवीन ज्वर असेल, ज्याला फार काळ लोटला नाही (जसे कि *संक्रमणजन्य आजारात आलेला ज्वर* ) अशा ज्वरामध्ये वायू व कफ यांची त्वरीत शुद्धी करून उपशय देते. 

  • "कास" : खोकला,
  • "आम" : अजीर्ण अन्न शरीरात राहिल्यामुळे तयार झालेले विषारी द्रव्य,
  • "पीनस" : सर्दी, नाकातून पाणी येणे, 
  • "श्वास" : दम लागणे,
  • "पार्श्वशूल" : बारगड्यां जागी दुखणे (जसे अति खोकला केल्यावर दुखते)

या सगळ्या लक्षणांमध्ये उष्ण पाण्याने त्वरित लाभ मिळतो.

वर्षा ऋतू, जो आता सुरू होण्यात आहे, त्यामधे तर उष्ण जल अनन्य साधारण महत्त्वाचे ठरते.

"वर्षाः शीता विदाहिन्यो वन्हिमान्द्य अनिलप्रदाः |"

वर्षा ऋतू शीत असतो, त्यात शीत अशा वात दोषाचा प्रकोप होऊन अनेक उपद्रव निर्माण होऊ शकतात. तसेच या ऋतुमधे अन्नाला पचन होताना अम्लता येण्याची शक्यता अधिक असते कारण अग्नी म्हणजेच संपूर्ण शरीराची पचन शक्ति कमजोर असते. अशा वेळी उष्ण जल हे सर्व दोषांवर उपद्रव होण्या आधीच इलाज ठरते.

"जलम् आश्वास कराणां श्रेष्ठम् |"

असे आयुर्वेदात म्हटले आहे. कोणताही रुग्ण किंवा स्वास्थ्य इच्छुक यांच्यामधे एक गोष्ट समान असते ती असते म्हणजे स्वास्थ्या विषयी साशंकता. मग ते स्वास्थ्य शारीरिक असो की मानसिक. ती साशंकता दूर करण्यात सगळ्यात श्रेष्ठ काय तर जल म्हणजेच पाणी असे आयुर्वेद सांगतो. त्यात जर ते पाणी उष्ण असेल तर त्याचे महत्व अनन्य साधारण वाढते यात शंकाच नाही.

#आयुर्वती_चिकित्सालय, #Aayurvati_Chikitsalay

Dr. Kanchan S. Khachane
Dr. Kanchan S. Khachane
B.A.M.S. (Ayurvedacharya)